सीबीडीटीने पॅन आणि आधार लिंक करण्याची अंतिम तारीख ३० जूनपर्यंत वाढली

 



नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस म्हणजेच सीबीडीटीने पॅन आणि आधार लिंक करण्याची अंतिम तारीख ३० जूनपर्यंत वाढवण्यात आली असल्याची माहिती एका निवेदनाद्वारे दिली आहे. या मुदत वाढीमुळे करदात्यांना पॅन आणि आधार लिंक करायला आणखी वेळ मिळेल. आतापर्यंत ५१ कोटींहून अधिक पॅन आधारशी जोडले गेले आहेत. प्राप्तिकर कायद्याच्या तरतुदींनुसार १ जुलै, २०१७ रोजी पॅन वाटप केलेल्या आणि आधार क्रमांक मिळविण्यासाठी पात्र असलेल्या प्रत्येक व्यक्तीने ३१ मार्च, २०२३ रोजी किंवा त्यापूर्वी विहित प्राधिकरणाला आपले आधार सूचित करणं आवश्यक आहे. पंरतु १ जुलैनंतर मात्र त्यांचं पॅन निष्क्रिय होईल आणि एक हजार रूपये शुल्क भरल्यानंतर आणि विहित प्राधिकरणाला आधारची सूचना दिल्यानंतरच ३० दिवसात पॅन पुन्हा चालू केलं जाईल.