राज्यातल्या सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पूर्ण

 


मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात घटनापीठासमोर आज दोन्ही पक्षांचा युक्तिवाद संपला. यासंदर्भातला निर्णय सर्वोच्च न्यायालयानं राखून ठेवला आहे.  राजकीय पक्ष हा विधीमंडळ पक्षापेक्षा वरचढ आहे या दाव्याचा पुनरुच्चार उद्धव ठाकरे यांचे वकील कपिल सिब्बल  यांनी युक्तिवादादरम्यान केला.