मुख्यमंत्र्यांनी दिली चवदार तळाला भेट

 


मुंबई (वृत्तसंस्था) : सुवर्ण मंदिराच्या धर्तीवर चवदार तळ्यासाठी देखील पाणी शुध्दीकरण यंत्रणा कार्यान्वित करण्याची सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. चवदार तळे सत्याग्रह दिनाचे औचित्य साधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल रात्री उशिरा महाड च्या चवदार तळ्याला भेट दिली आणि  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. ते बुध्दवंदनेतही सहभागी झाले. यावेळी रायगडचे पालकमंत्री उदय सामंत, आमदार भरत गोगावले यांची आदि त्यांच्या समवेत होते. आज चवदार तळे सत्याग्रह दिनानिमित्त हजारो आंबेडकर अनुयायांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं.