कापसाला अपेक्षित भाव मिळत नसल्याच्या निषेधार्थ यवतमाळमधे आंदोलन

 

मुंबई (वृत्तसंस्था) : कापसाला अपेक्षित भाव मिळत नसल्याच्या निषेधार्थ आज आम आदमी पक्षाने यवतमाळमधे कापसाची होळी करुन आंदोलन केलं. कापसाला प्रतिक्विंटल 15 हजार रुपये भाव अपेक्षित असताना भाव ८ हजारावर उतरले आहेत, हे शेतकऱ्यांना परवडणारं नाही असं आंदोलनकर्ते माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी सांगितलं.

कापसाला योग्य भाव, पीक विम्याचा लाभ, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान इत्यादी मागण्यांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनंही यवतमाळ जिल्ह्यातआंदोलन केलं. राळेगाव तालुक्यात दहेगाव देवधरी फाट्याजवळ आंदोलनकर्त्यांनी सुमारे दोन तास वाहतूक रोखून धरली. येत्या 6 दिवसात मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा मनसे ने दिला आहे.