बिल गेट्स रोगनिदान, पर्यावरण दक्षता आणि प्राण्यांवरील लसींवर भारताबरोबर भागीदारी करण्याची शक्यता

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स यांनी आज ओपन सोर्स डिसीज मॉडेलिंग, भविष्यातलं रोगनिदान, पर्यावरण दक्षता आणि प्राण्यांवरील लसींवर शाश्वत भागीदारी आणि सहयोग आदी क्षेत्रात भारता बरोबर भागीदारी करण्याची शक्यता व्यक्त केली. गेट्स यांनी भारत सरकारचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार प्राध्यापक अजय कुमार सूद यांची  या संदर्भात आज नवी दिल्लीत भेट घेतली. या भेटीत एक आरोग्य अभियान आणि टाकाऊ पासून संपत्ती अभियानावर प्राधांन्यानं लक्ष केंद्रित करण्यावर प्रामुख्यानं चर्चा झाली.

आगामी वन हेल्थ मिशन आणि रोग नियंत्रणासाठी पर्यावरणीय देखरेखीच्या सामर्थ्यावर भारत सरकारच्या प्रयत्नांना पाठिंबा देण्यासाठी गेट्स यांनी या बैठकीत भर दिला. प्राण्यांचे आरोग्य,  रोगांचं प्रारुप आणि नवीन निदान तंत्रज्ञान यावरही त्यांनी नवकल्पनांच्या गरजेवर भर दिला. या क्षेत्रांमध्ये देशांतर्गत आणि जागतिक आव्हानांना तोंड देण्यासाठी भारतासाठी असलेल्या संधीवरही त्यांनी भाष्य केलं.