मासिक पाळीच्या रक्ताचा जादुटोण्यासाठी सौदा झाल्याच्या घटनेची राज्य महिला आयोगाकडून दखल

 


पुणे : पुण्यात मासिक पाळीच्या रक्ताचा जादुटोण्यासाठी सौदा झाल्याच्या घटनेची राज्य महिला आयोगाने दखल घेतली आहे. त्यावर कारवाई होणार असल्याची माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिली. नागरिकांनी सजग, सतर्क रहावं आणि अशा अंधश्रद्धांना बळी पडू नये,' असं आवाहन त्यांनी केलं आहे.