महाराष्ट्रातील विकास प्रकल्पांसाठी जपान इंटरनॅशनल कोऑपरेशन एजन्सी – जायका यांनी अर्थसहाय्य करण्याची मुख्यमंत्र्यांची विनंती

 

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई तसेच महाराष्ट्रात येणाऱ्या काळात अनेक मोठे विकास प्रकल्प सुरु होत असून त्यासाठी जपान इंटरनॅशनल कोऑपरेशन एजन्सी – जायका यांनी अर्थसहाय्य करावं अशी विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जायकाचे अध्यक्ष डॉ. तनाका अखिको यांना केली आहे. आज सकाळी वर्षा निवासस्थानी  जायकाचे अध्यक्ष डॉ तनाका अखिको,  मुख्य प्रतिनिधी  साईतो मित्सुनोरी आणि त्यांच्या शिष्टमंडळानं मुख्यमंत्र्यांची भेट घेतली त्या वेळी त्यांनी ही विनंती केली.  राज्य शासनाला जायकाचं पूर्ण सहकार्य राहील अशी ग्वाही जायकाच्या अध्यक्षांनी दिली.

मुंबईतील भूमिगत मेट्रो, मुंबई-गोवा महामार्ग तसेच विरार-अलिबाग मल्टीमोडल कॉरिडोर या व इतरही काही मोठ्या प्रकल्पांसाठी जायकानं अर्थसहाय करण्यावर चर्चा झाली.  अशा मोठ्या प्रकल्पांना अर्थसहायाबाबत जायका आणि राज्य शासन यात समन्वय असावा यासाठी एक समन्वयन अधिकारी शासन नेमेल असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी शिष्टमंडळाला सांगितलं. यावेळी एमएमआरडीएचे महानगर आयुक्त एसव्हीआर श्रीनिवासन, आदी अधिकारी उपस्थित होते. 

Popular posts
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image