आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची श्रीलंकेच्या कर्जमाफी कार्यक्रमास मान्यता

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या कार्यकारी मंडळाने विस्तारित निधी सुविधेअंतर्गत श्रीलंकेच्या कर्जमाफी कार्यक्रमास मान्यता दिली आहे. सुमारे 3 अब्ज डॉलर्सच्या समतुल्य 2 अब्ज 286 कोटीचे विशेष वितरण अधिकारांचं पॅकेज ४ वर्षांसाठी श्रीलंकेला देण्यात आलं आहे. कार्यकारी मंडळाच्या या निर्णयामुळे 333 दशलक्ष डॉलर्सचं कर्ज वितरण त्वरित शक्य होईल.या कालावधीत श्रीलंकेला आर्थिक स्थिरतेसाठी बहुप्रतिक्षित कर्ज मंजुरीसह, स्थूल आर्थिक  आणि कर्ज स्थिरता पुनॆसंचयनाचे  प्रयत्न  करता येतील. IMF च्या व्यवस्थापकीय संचालक क्रिस्टालिना जॉर्जिव्हा यांनी सांगितले की आय एम एफ IMF-समर्थित कार्यक्रमाशी सुसंगत कर्ज स्थिरता  राखण्यासाठी श्रीलंकेच्या ​​अधिकारी आणि कर्जदारांनी जलद प्रगती करणं आवश्यक आहे. जॉर्जिव्हा पुढे म्हणाल्या की, श्रीलंकेने सध्याच्या महागाईवर मात करण्यासाठी शासनाची विश्वासार्हता सुरक्षित ठेऊन  बहु-आयामी  धोरणासाठी वचनबद्ध राहिले पाहिजे.