मनीष सिसोदिया यांच्या न्यायालयीन कोठडीत ३ एप्रिलपर्यंत वाढ

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उत्पादन धोरण घोटाळा प्रकरणी, मनीष सिसोदिया यांची न्यायालयीन कोठडी नवी दिल्ली इथल्या न्यायालयानं १४ दिवस, म्हणजेच येत्या ३ एप्रिल पर्यंत वाढवली आहे. न्यायालयानं गेल्या ६ मार्च रोजी सिसोदिया यांना न्यायालयीन कोठडी दिली होती. उत्पादन धोरण प्रकरणी सीबीआय नं अटक केल्यावर सिसोदिया यांनी गेल्या २८ फेब्रुवारी रोजी आपल्या उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर ९ मार्च रोजी त्यांना ईडी, अर्थात सक्तवसुली संचालनालयानं अटक केली होती. १७ मार्च पर्यंत त्यांना ईडी ची कोठडी देण्यात आली, नंतर ती २२ मार्च पर्यंत वाढवण्यात आली होती.