सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याबाबत सरकार सकारात्मक- उपमुख्यमंत्री

 


मुंबई (वृत्तसंस्था) : सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याबाबत सरकार सकारात्मक असल्याचं, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत सांगितलं. यासाठीचा आर्थिक ताळेबंद कसा बसावयाचा याचा अभ्यास सुरू असून, अधिवेशन संपल्यानंतर मान्यताप्राप्त कर्मचारी संघटनांनी याबाबत सुचवलेल्या पर्यायांबाबत बैठक घेणार असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं.