उर्ध्व पैनगंगा प्रकल्पातली पाण्याची तूट भरून काढण्यासाठी पाणलोट क्षेत्रातून पाणी उचलण्याचे परवाने दिले जाणार नाहीत- उपमुख्यमंत्री

 

मुंबई (वृत्तसंस्था) : धरणांच्या पाणलोट क्षेत्रातून पाणी देण्याची परवानगी देणं बंद करण्याची मागणी अशोक चव्हाण यांनी काल विधानसभेत केली. उर्ध्व पैनगंगा प्रकल्पाच्या अनुषंगानं त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर बोलताना, सध्या या प्रकल्पातून हिंगोलीसाठी राज्यपालांच्या सूचनेनुसार पाणी दिलं जात असल्याचं सांगितलं. मात्र उर्ध्व पैनगंगा प्रकल्पातली पाण्याची तूट भरून काढण्यासाठी ठोस उपाय केले असून, यापुढे पाणलोट क्षेत्रातून पाणी परवाने दिले जाणार नसल्याचं ते म्हणाले.