विरोधी पक्ष सदस्यांचा आजही संसदेत प्रचंड गदारोळ

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अदानी हिंडेनबर्ग प्रकरणी चौकशीची मागणी करत विरोधी पक्ष सदस्यांनी  आजही संसदेत प्रचंड गदारोळ केला. त्यामुळे दोन्ही सभागृहांचं कामकाज दोन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. लोकसभेत कामकाज सुरु होताच काँग्रेस , द्रमुक, तृणमूल काँग्रेस, जनता दल संयुक्त, शिवसेना ठाकरे गट, इत्यादी पक्षांच्या सदस्यांनी घोषणा द्यायला सुरुवात केली. अदानी घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी संयुक्त संसदीय समिती नियुक्त करण्याची मागणी ते करत होते. सभापती ओम बिरला यांनी वारंवार सांगूनही सदस्यांनी घोषणा थांबवल्या नाहीत. त्यामुळे सभापतींनी कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब केलं.

राज्यसभेत या प्रकरणी विरोधकांनी मांडलेला स्थगन प्रस्ताव अध्यक्ष जगदीप धनखड यांनी फेटाळला. त्यानंतर काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, द्रमुक, समाजवादी पार्टी, डावे पक्ष, आणि शिवसेना ठाकरे गटाच्या सदस्यांनी निषेधाच्या घोषणा देत प्रचंड गदारोळ केला. सदस्यांचं वर्तन देशवासियांच्या सभागृहाकडून असलेल्या अपेक्षांना हरताळ फासणारं असल्याचं उपराष्ट्रपती धनखड म्हणाले. मात्र गदारोळ चालूच राहिल्यानं कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब करावं लागलं. 

Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image