काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना लोकसभा सचिवालयाची कारणे दाखवा नोटीस

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरच्या आभारदर्शक ठरावावर झालेल्या चर्चेत केलेल्या भाषणाबाबत लोकसभा सचिवालयानं त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. राहुल गांधी यांनी केलेल्या भाषणात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर अनेक आरोप केले होते. मात्र काहीही पूर्वसूचना न देता तसंच कुठलेही पुरावे अथवा कागदपत्र सादर न करता असे आरोप केल्याबद्दल ही नोटीस बजावली आहे. त्यांनी १५ फेब्रुवारीपर्यंत आरोपांबद्दलचे पुरावे सादर करावेत, असं सचिवालयानं सांगितलं आहे. राहुल गांधी यांनी हे पुरावे द्यावे अन्यथा सभागृहाची माफी मागावी, असं भाजपा खासदार निशिकांत दुबे यांनी म्हटलं आहे.