भाजपा प्रदेश कार्यकारिणीची बैठक आजपासून नाशिकमधे - देवेंद्र फडनवीस

 

मुंबई (वृत्तसंस्था) : भाजपा प्रदेश कार्यकारिणीची बैठक आजपासून दोन दिवस नाशिकमधे होत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या बैठकीला राज्य मंत्री मंडळातले भाजपाचे मंत्री आणि भाजपा पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. आज संध्याकाळी स्थानिक पदाधिकारी बैठक, तर उद्या प्रदेश पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चर्चासत्रं आणि विविध राजकीय ठराव केले जाणार आहेत.

भाजपाचे महाराष्ट्र प्रभारी आणि प्रदेश महामंत्री विजय चौधरी आणि प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील यांनी काल नाशिकमधे वार्ताहर पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. भाजपाचे राज्यभरातील जिल्हाध्यक्ष, संघटन सचिव यांच्यासह सातशेहून अधिक कोअर कमिटी सदस्य या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.