महिलांसाठी साडे सात टक्के व्याज दर देणाऱ्या महिला सन्मान बचत पत्राची घोषणा

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त महिला सन्मान बचत पत्र योजना ही नवी योजना सरकारनं आणली आहे. मार्च २०२५ पर्यंत ही योजना लागू राहणार आहे. या योजने अंतर्गत २ लाखांपर्यंतची रक्कम २ वर्षे मुदतीसाठी साडे ७ टक्के इतक्या व्याजानं महिलांच्या किंवा मुलींच्या नावे  जमा करता येईल. यामध्ये अंशतः रक्कम काढण्याची सुविधा देखील देण्यात आली आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या बचत योजनांमधल्या ठेवींची कमाल मर्यादा १५ लाखांवरून ३० लाखांवर नेण्यात आली आहे. मासिक उत्पन्न योजनेत ठेवण्यात येणाऱ्या ठेवींची कमाल मर्यादा दुप्पट म्हणजेच साडे ४ लाखावरुन ९ लाख करण्याचा प्रस्ताव अर्थमंत्र्यांनी आज मांडला. संयुक्त खात्यासाठी ही मर्यादा ९ लाख रुपयांवरून १५ लाख रुपये करण्याचा प्रस्ताव आहे.