भारतीय रेल्वेकडून ई-कॅटरिंग सेवांद्वारे जेवण ऑर्डर करण्यासाठी व्हाट्सअप संप्रेषण सुरू

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) भारतीय रेल्वेनं सेवा अधिक ग्राहक-केंद्रित करण्याच्या उद्देशानं प्रवाशांसाठी ई-कॅटरिंग सेवांद्वारे जेवण ऑर्डर करण्यासाठी व्हाट्सअप संप्रेषण सुरू केलं आहे. यासाठी रेल्वेचा व्हाट्सअप क्रमांक ९१-८७५०००१३२३ याचा वापर प्रवासी करू शकतात. सुरुवातीला, व्हॅट्सऍपद्वारे ई-कॅटरिंग सेवेची दोन टप्प्यांत अंमलबजावणीची योजना आखण्यात आली होती.

आता ग्राहकांना थेट आय आर सि टी सी च्या ई-कॅटरिंग वेबसाइटद्वारे स्टेशनवर उपलब्ध असलेल्या उपहारगृहातून त्यांच्या आवडीचे जेवण मागवता येईल. सध्या निवडक गाड्या आणि स्थानकांवर ई-कॅटरिंग सेवेसाठी ही सेवा लागू करण्यात आली आहे. आणि ग्राहकांच्या प्रतिक्रिया आणि सूचनांच्या आधारे, रेल्वे इतर गाड्यांमध्येही ते लवकरच सुरु करण्यात येणार आहे.