पायाभूत सुविधांना प्राधान्य देताना पर्यावरणाचा समतोल राखण्याची काळजी घेऊ - मुख्यमंत्री

 


मुंबई (वृत्तसंस्था) : पायाभूत सुविधांना राज्य सरकारचं प्रधान्य असून विकासकामं करताना पर्यावरणाचा समतोल राखला जाईल, याची काळजी घेउन प्रकल्प राबवत इसल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. ते आज एका खाजगी वृत्तवाहिनीनं आयोजित केलेल्या महाराष्ट्राचा महासंकल्प या परिषदेत बोलत  होते. सेंद्रिय शेतीला सरकारनं प्राधान्य दिलं आहे. शेतीला पाणी मिळावं यासाठी, रखडलेले सिंचन प्रकल्प सुरु केले आहेत. नव्या प्रकल्पांना मान्यता दिली जात आहे, असं त्यांनी सांगितलं. फक्त मुंबईचा विकास न करता आजुबाजुच्या शहरांचा, भागाचा विकास झाला पाहिजे, यावर सरकारनं भर दिला आहे. वर्सोवा ते विरार सी-लिंक प्रकल्प प्रस्तावित आहे. बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजनेचा विस्तार केला जाणार आहे. मुंबई हे आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर व्हावं, यासाठी आवश्यक ते सर्व करण्याची राज्यसरकारची तयारी आहे. वाहतूक कोंडीचा प्रश्न मेट्रोमुळे सुटेल, मेट्रोचं संपूर्ण जाळ कार्यान्वित झाल्यावर मुंबईतल्या साठ ते सत्तर हजार खाजगी गाड्या रस्त्यावर येणार नाहीत, असं मुख्यमंत्री म्हणाले. राज्यात आयटी हब, फार्मा हब तयार केलं जाईल असं त्यांनी सांगितलं.