घाटजाई देवीच्या यात्रेनिमित्त गर्दी लक्षात घेता, वाहतुकीच्या मार्गांमध्ये बदल

 


मुंबई (वृत्तसंस्था) : सातारा जिल्ह्यातल्या पाचगणी इथल्या घाटजाई देवीच्या यात्रेनिमित्त भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता, येत्या १५ आणि १६ फेब्रुवारी रोजी या भागातल्या वाहतुकीच्या मार्गांमध्ये  बदल करण्यात आला आहे. या काळात महाबळेश्वर कडून वाई कडे जाणारी वाहतूक, एसटी स्टॅन्ड चौक पाचगणी मार्गे - राहिल प्लाझा- टेबल लॅन्ड कॉर्नर - अपना हॉटेल- भिमनगर - जुने पोलीस ठाणे ते मेन रोड मार्गावर वळवण्यात आली आहे. तर वाईकडून महाबळेश्वरकडे जाणारी वाहतूक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान-चेसन रोड शॉलम हायस्कुल- न्यू ईरा हायस्कुल मार्गे - रश्मी चौक मेन रोड या मार्गावर वळवण्यात आली आहे. तसंच, महाबळेश्वर वरुन वाई - आणि पुण्याकडे जाणारी अवजड वाहनांची वाहतुक संजीवर नाका मार्गे  करहर-कुडाळा-पाचवड मार्गे,  आणि महाबळेश्वरकडे जाणारी अवजड वाहनांची वाहतुक पाचवड मार्गे - कुडाळ- करहर - संजीवन नाका अशी वळवण्यात आल्याची माहिती जिल्हा माहिती कार्यालयानं जारी केलेल्या निवेदनात दिली आहे.