नागरिकांना किफायतशीर किमतीत ऊर्जा सुरक्षेची ग्वाही देण्यासाठी प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली भारत मोठी प्रगती करत आहे - मंत्री हरदीप सिंग पुरी

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) नागरिकांना किफायतशीर किमतीत ऊर्जा सुरक्षेची ग्वाही देण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत मोठी प्रगती करत असल्याचं पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी सांगितलं. भारत ऊर्जा सप्ताह २०२३ दरम्यान नवव्या आशिया मंत्रिगट ऊर्जा बैठकीत ते बाेलत होते. समावेशक वाढ आणि ऊर्जा वाटपात न्याय  यासाठी परवडण्यायोग्य ऊर्जा हा मोठी घटक असल्याचं ते म्हणाले. 

अपारंपरिक, आण्विक किंवा प्रगत जैव इंधनासाठी विविध उपाययोजनांवर काम करायची गरज आहे, असं त्यांनी नमूद केलं. भारतात आत्तापर्यंत १० टक्के इथेनॉल मिश्रित जैव इंधन तयार केलं आहे २०३० पर्यंत २० टक्के गाठण्याचं लक्ष असल्याचं त्यांनी सांगितलं. हवामान बदलाविषयी पुरी यांनी चिंता व्यक्त केली. हवामान बदल कमी करण्यासाठी विकासासाठी कमी कार्बन उत्सर्जन मार्ग निवडायला हवेत असं त्यांनी सुचवलं.