मालाड इथं झोपडपट्टीला आग

 


मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईतल्या मालाड इथं झोपडपट्टीला लागलेल्या आगीत एका १२ वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला, तर एक व्यक्ती जखमी झाली. या व्यक्तिला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सकाळी अकरा वाजण्याच्या सुमाराला लागलेल्या आगीत जवळपास १०० झोपड्या या आगीत जळून खाक झाल्या, अशी माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली.  आगीवक नियंत्रण मिळवण्याचं काम अजून सुरू आहे. या आगीचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही.