वीज निर्मिती कायदा २०२२ लागू होऊ देणार नसल्याचा शरद पवार यांचा इशारा

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) वीज निर्मिती कायदा २०२२ लागू होऊ देणार नाही असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला आहे. नाशिक इथं महाराष्ट्र राज्य वीज कामगार महासंघाच्या विसाव्या त्रैवार्षिक महाधिवेशनाचं उद्‌घाटन पवार यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते.

नुकताच सुधारित विद्युत निर्मिती कायदा संसदेत सादर करण्यात आला, या कायद्याला आमचा विरोध आहे असं पवार म्हणाले. राज्यातील सरकारी वीज कंपन्यांमध्ये ४० ते ४५ हजार कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागा तातडीने भराव्यात, इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रासह देशभरात कंत्राटी कर्मचारी रोजंदारी कर्मचारी म्हणून समाविष्ट करण्याचा निर्णय व्हावा असं पवार यावेळी म्हणाले.