दिव्यांगजनांच्या सोयीसाठी, तयार वाहनांमध्ये बदल केलेल्या वाहनांचे तात्पुरत्या नोंदणी द्वारे रुपांतर करण्यासाठीची अधिसूचना जारी

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने (MoRTH) 9 फेब्रुवारी 2023 रोजी एक अधिसूचना जारी केली आहे. त्याद्वारे दिव्यांगजनांच्या सोयीसाठी ज्या वाहनांमध्ये बदल केले आहेत, अशा वाहनांचे तात्पुरत्या नोंदणीद्वारे रुपांतर करता येईल.

दिव्यांगजनांच्या विशिष्ट गरजांनुसार मोटार वाहनांमध्ये अनेकदा बदल करणे आवश्यक असते, ज्यायोगे त्यांच्यासाठी वाहनाचा वापर आणि प्रवास शक्य होतो. सध्या, असे रुपांतर एकतर वाहनाच्या नोंदणीपूर्वी, निर्माता किंवा त्याच्या अधिकृत विक्रेत्या द्वारे किंवा नोंदणी प्राधिकरणाकडून मिळालेल्या परवानगीच्या आधारावर वाहनाच्या नोंदणीनंतर केले जाऊ शकते. ही प्रक्रिया सुलभ करण्यासाठी, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने नियम 53A आणि 53B मध्ये सुधारणा प्रस्तावित केल्या आहेत, ज्यामुळे मोटार वाहनांच्या रुपांतरासाठी तात्पुरती नोंदणीची सुविधा उपलब्ध होईल.

दुरुस्ती नियमातील प्रमुख तरतुदी खालीलप्रमाणे आहेत:

1.नियम 53A मध्ये, तात्पुरत्या नोंदणीसाठी अर्ज करण्याचे कारण विस्तारित करण्यात आले आहे, ज्यामध्ये पूर्णपणे तयार असलेल्या मोटार वाहनांचा समावेश करण्यात आला आहे ज्याचे रुपांतरित वाहनामध्ये परिवर्तन करायचे आहे.

2.नियम 53B मध्ये, उपनियम 2 अंतर्गत एक तरतूद जोडण्याचा प्रस्ताव आहे, ज्यामध्ये हे नमूद केले जाईल की पूर्णतः तयार केलेल्या मोटार वाहनाचे रुपांतरित वाहनामध्ये परिवर्तन करण्यासाठी, तसेच मोटार वाहनाची नोंदणी विक्रेता ज्या राज्यामध्ये आहे त्या राज्याव्यतिरिक्त अन्य राज्यात होत असेल, तर तात्पुरत्या नोंदणीची वैधता 45 दिवस असेल.

या दुरुस्त्यांमुळे दिव्यांगजनांना मोटार वाहने चालवणे अधिक सुलभ होईल अशी अपेक्षा आहे.

सर्व भागधारकांकडून तीस दिवसांच्या कालावधीत प्रतिक्रिया आणि सूचना मागवण्यात आल्या आहेत.

राजपत्र अधिसूचनेसाठी येथे क्लिक करा.