राहुल गांधींविरुद्ध भाजपाने दिली हक्कभंगाची नोटीस

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्याविरुद्ध भारतीय जनता पार्टीने हक्कभंगाची नोटीस जारी केलीआहे. लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणाबद्दल आभारप्रस्तावावरच्या चर्चेत काल गांधी यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर आरोप केल्याबद्दल ही नोटीस देण्यात आली आहे. गांधी यांची विधानं दिशाभूल करणारी आणि अवमानकारक होती, असं खासदार निशिकांत दुबे यांनी सभापती ओम बिर्ला यांना लिहीलेल्या पत्रात म्हटलं आहे.

सभागृहाचं कामकाज सुरु झाल्यावर संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी हा मुद्दा उपस्थित केला. गांधी यांनी केलेले आरोप बिनबुडाचे असून त्यांना कागदोपत्री पुरावे सादर करायला सांगावं अशी मागणी जोशी यांनी केली. आपण यात लक्ष घालू असं आश्वासन सभापती बिरला यांनी यावर दिलं.