मोकाट गुरांच्या त्रासाबाबतच्या कायद्यात सुधारणा करणारं विधेयक मंजूर

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्याच्या ग्रामीण भागात सातत्यानं होणाऱ्या मोकाट गुरांच्या त्रासाबाबतच्या कायद्यात सुधारणा करणारं विधेयक विधानसभेत आज मंजूर करण्यात आलं. जुन्या कायद्यात मोकाट गुरांच्या मालकाला पहिल्या अपराधासाठी तीनशे रुपये दंड आणि एक महिना कारावास होता, त्यानंतरच्या अपराधासाठी पाचशे, ते दोन हजार असा दंड आणि कारावास होता. नवीन कायद्यानुसार, पहिल्या अपराधासाठी सरसकट दीड हजार रुपये दंड वसूल कला जाईल. तर पुढच्या प्रत्येक अपराधासाठी पाच हजार रुपये दंड आकारला जाणार आहे. कारावासाची तरतूद काढून टाकली आहे.