भरड धान्य, सेंद्रीय शेती, कांदळवनाला प्रोत्साहन देण्यासाठी विविध योजनांची सरकारकडून घोषणा

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : यंदाच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी भरड धान्यासाठी श्री अन्न हा नवा शब्द प्रयोग वापरला. भरड धान्य वर्षांचं औचित्य साधून त्यांची लागवड, साठवण आणि वितरण विक्रीसाठी सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. भरड धान्यांची लागवड आणि उत्पादन वाढवण्यासाठी संशोधनालाही प्रोत्साहन देण्यात येणार आहे. या क्षेत्रात कार्यरत हैद्राबादच्या संस्थेला प्रोत्साहन दिलं जाणार आहे. कृषी क्षेत्रात यंदाच्या भरड धान्य वर्षांचं औचित्य साधून त्यांच्या लागवड, साठवण आणि वितरण विक्री साठी सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. भरड धान्यांची लागवड आणि उत्पादन वाढवण्यासाठी संशोधनालाही प्रोत्साहन देण्यात येणार आहे. या क्षेत्रात कार्यरत हैद्राबादच्या श्रीअन्न केंद्राला विशेष योगदान, भरड धान्य आणि कडधान्यांच्या साठवणीसाठी विकेंद्रीत गोदाम सुविधा, विक्रीसाठी विशेष हब इत्यादी योजना अर्थसंकल्पात प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. याखेरीज कृषी आधारित जोड उद्योगांसाठी २० लाख कोटी रुपये पतपुरवठ्याची तरतूद, मत्स्यव्यवसायासाठी ६ हजार कोटी, नैसर्गिक आणि सेंद्रीय शेतीसाठी संशोधन आणि सहकार्य सुविधा पुरवण्याची योजना आखण्यात आली आहे. सहकार क्षेत्राला विशेष प्रोत्साहनपर योजना देण्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी आपल्या भाषणात केली. 

Popular posts
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image