आमदार आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेदरम्यान दगडफेकी

 

मुंबई (वृत्तसंस्था) : शिवसेना नेते, आमदार आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेदरम्यान काल दगडफेकीची घटना घडली. औरंगाबाद जिल्ह्यात वैजापूर तालुक्यातल्या महालगाव इथून जाहीर सभा घेऊन आदित्य ठाकरे यांचा ताफा औरंगाबादकडे येत असताना ही घटना घडली. पोलिसांनी लवकरच गर्दीवर नियंत्रण मिळवलं. 

दरम्यान, आदित्य ठाकरे यांच्या सभेत काही समाजकंटकांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला असून, सरकारनं जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याची प्रतिक्रीया विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिली आहे.