सर्वोच्च न्यायालयानं राज्य सरकारच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर लवकर निर्णय द्यायला हवा - उद्धव ठाकरे

 

मुंबई (वृत्तसंस्था) : सर्वोच्च न्यायालयानं राज्यसरकारच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर लवकर निर्णय द्यायला हवा असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे. ते आज  मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. अपात्रतेच्या मुद्द्यांसंदर्भात निवडणूक आयोगाच्या निर्णयाकडे लक्ष असल्याचं देखील ते म्हणाले. शिवसेनेच्या घटनेप्रमाणे पक्षात पदांची निर्मिती झाली आहे. निवडणूक आयोगाकडून परवानगी मिळाल्यानंतर पक्षांतर्गत निवडणूक घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं.