आमदार डॉ.प्रज्ञा सातव यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा रुपाली चाकणकर यांच्याकडून जाहीर निषेध

 

मुंबई (वृत्तसंस्था) : आमदार डॉ.प्रज्ञा सातव यांच्यावर काल झालेल्या हल्ल्याचा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी जाहीर निषेध केला आहे. याबाबत राज्य महिला आयोगानं हिंगोली पोलिस अधिक्षकांशी  पत्रव्यवहार केला आहे.

संबंधीत आरोपीवर कडक कारवाई करण्याच्या सूचना देखील आयोगातर्फे  दिल्या आहेत. राज्याच्या गृह विभागानं यामध्ये तातडीनं लक्ष घालावं, तसंच सातव यांना पोलीस संरक्षण द्यावं अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.