केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उत्तर प्रदेशातील बलिया येथील 6500 कोटी रुपये गुंतवणुकीच्या 7 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे उद्घाटन

 

नवी दिल्‍ली : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज उत्तर प्रदेशातील बलिया येथील चिटबाडा गावात 6500 कोटी रुपये गुंतवणुकीच्या 7 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे उद्घाटन केले. यावेळी बोलताना गडकरी म्हणाले की, बलियाला जोडणाऱ्या या द्रुतगती महामार्गाच्या बांधकामामुळे लखनौहून पाटण्याला पूर्वांचल द्रुतगती मार्गाने अवघ्या साडेचार तासात पोहोचणे शक्य होणार आहे.

मंत्री म्हणाले की, बलिया येथील शेतकऱ्यांचा भाजीपाला लखनौ, वाराणसी आणि पाटणा येथील मंडईंमध्ये सहज पोहोचू शकेल. ते म्हणाले की, या महामार्गामुळे भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना वाराणसी, गाझीपूर आणि हल्दिया या तीनही मल्टी-मॉडल टर्मिनलचा थेट लाभ मिळेल. या कार्यक्रमा दरम्यान गडकरी यांनी बलिया-आरा दरम्यानच्या 1500 कोटी रुपये खर्चाच्या 28 किमी लांबीच्या नवीन हरित  जोड मार्गाची घोषणाही केली.

Popular posts
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी ‘स्वीप’ उपक्रमांवर भर द्यावा - जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे
Image