भाजपा अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांची अध्यक्षपदी फेरनिवड

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भाजपाचे अध्यक्ष जे पी नड्डा यांचा कार्यकाल पुढच्या वर्षी जूनपर्यंत वाढवला आहे. नवी दिल्लीत आज भाजपाच्या  कार्यकारिणी बैठकीत एकमतानं हा निर्णय झाला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि नड्डा यांच्या नेतृत्वाखाली २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपा २०१९ पेक्षा अधिक मताधिक्यानं विजयी होईल असा विश्वास भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी व्यक्त केला. .