प्रधानमंत्र्यांच्या उपस्थितीत मुंबईत झालेला कार्यक्रम उद्धव ठाकरेंना लक्ष्य करण्यासाठी होता - अजित पवार

 

मुंबई (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्र्यांच्या उपस्थितीत मुंबईत झालेला कार्यक्रम हा मुंबई महानगरपालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आणि उद्धव ठाकरेंना लक्ष्य करण्यासाठी होता, अशी टीका विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी केली. सांगली जिल्ह्यात अंजनी इथं आर आर पाटील यांच्या समाधीस्थळी दर्शन घेतल्यानंतर पवार प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

विकास कामाविषयी जर चर्चा होत असते. आमचे पक्ष आणि विचारधारा जरी वेगळी असली तरी आम्ही काही एकमेकांचे शत्रू नाही. बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार एकमेकां बद्दल टीकात्मकभाषण करायचे. पण एकत्र भेटल्यावर मैत्रीपूर्ण बोलायचे आणि हीच आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे, असं ते म्हणाले.