सिंधू पाणी वाटप करारात बदल करण्यासंदर्भात भारताची पाकिस्तानला नोटीस

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) सिंधू पाणी वाटप करारात बदल करण्यासंदर्भात भारतानं पाकिस्तानला नोटीस जारी केली आहे. या महिन्यात २५ जानेवारीला सिंधू पाणी वाटप करारासंबंधित आयुक्तांनी ही नोटीस पाकिस्तानला देऊन या कराराच्या  पाकिस्तानकडून झालेल्या उल्लंघनाबाबत येत्या नव्वद दिवसांत द्विपक्षीय  वाटाघाटीमध्ये सहभाग घेण्याची सूचना केली आहे. भारतानं कायमच सिंधू पाणी वाटप कराराचं जबाबदारीनं पालन केलं आहे. 

पाकिस्तानकडून मात्र कायमच या कराराच्या तरतुदींचं आणि अंमलबजावणीचं उल्लंघन केलं जातं.  वर्ष २०१७ ते २०२२ या पाच वर्षांच्या कालावधीत  झालेल्या  सिंधू पाणी वाटप कराराबाबतचे  मतभेद मिटवण्यासाठी झालेल्या पाच बैठकांमध्ये भारताकडून अत्यंत जबाबदारीने प्रयत्न केले गेले आहेत. मात्र पाकिस्तानकडून याबाबत सहकार्य मिळत नाही, यामुळेच आयुक्तालयाला ही नोटीस द्यावी लागली आहे. अशी माहिती  सूत्रांनी दिली आहे.