प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पोलीस महासंचालक आणि पोलीस महानिरीक्षकांच्या राष्ट्रीय परिषदेला करणार संबोधित

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीत पोलीस महासंचालक आणि पोलीस महानिरीक्षकांच्या राष्ट्रीय परिषदेला उपस्थित राहणार आहेत. ही परिषद तीन दिवस चालणार आहे.

राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे पोलीस महासंचालक आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आणि केंद्रीय पोलीस संघटनांचे प्रमुख या परिषदेत प्रत्यक्ष उपस्थित राहणार आहेत. सायबर क्राईम, पोलीस दलातील तंत्रज्ञान, नक्षलवाद आणि दहशतवादाचा मुकाबला करण्यासमोरची आव्हानं, क्षमता बांधणी तसेच तुरुंग सुधारणा यासह इतर विषयावर या बैठकीत चर्चा होणार आहे.

Popular posts
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे कार्यक्षेत्रात स्वच्छ महाराष्ट्र अभियान - निबंध, चित्रकला, घोषवाक्य स्पर्धा
Image
जागतिक वारसा दिनाचे औचित्य साधून मुंबई आणि महाराष्ट्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन
Image
स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कृतज्ञतापूर्वक वंदन
Image
राज्यातील कामगारांच्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी संपर्क अधिकाऱ्यांची नियुक्ती - कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांची माहिती
Image
भारतानं सादर केलेल्या अजेंड्याला सदस्य देशांची प्राथमिक पातळीवर सहमती
Image