राज्यातल्या पोलीस अधिकाऱ्यांनी आपल्या कामात पारदर्शकता ठेवावी - उपमुख्यमंत्री

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपल्या कामात पारदर्शकता ठेवावी असं उपमुख्यमंत्री, तसंच गृहमंत्री  देवेंद्र फडनवीस यांनी म्हटलं आहे. राज्यातली गुन्हेगारी आणि कायदा- सुव्यवस्था याबाबत फडनवीस यांच्या अध्यक्षतेखाली गेल्या शनिवारी पुण्यामध्ये राज्याच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची परिषद झाली, त्यावेळी ते बोलत होते. 

मागच्या सरकारच्या काळात महाराष्ट्र पोलिसांच्या प्रतिमेला बाधा पोहोचल्याचं परिषदेनंतर बातमीदारांशी बोलताना ते म्हणाले. महाराष्ट्र पोलीस हे देशातल्या सर्वोत्तम पोलीस दलांपैकी एक असून, ते बदलत्या काळाशी जुळवून घेतील आणि सामाजिक शांतता आणि सौहार्दाचं निर्धारित उद्दिष्ट एकत्रितपणे साध्य करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.