मुला मुलींनी खेळाकडे फक्त खेळ म्हणून न पाहता करियर म्हणूनही पहावं- चंद्रकांत पाटील

 

मुंबई (वृत्तसंस्था) : जागतिक स्तरावर पदक मिळवणाऱ्या खेळाडूला राज्य शासन नोकरी देत आहे, त्यामुळे मुला मुलींनी खेळाकडे फक्त खेळ म्हणून  न पाहता करियर म्हणूनही पहावं, असं आवाहन उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सातारा जिल्ह्यात कराड इथं केलं. कराड इथं आयोजित तंत्रशिक्षण पुणे विभागीय क्रीडा स्पर्धेचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते.

कोविडमुळे विस्कळीत झालेलं जनजीवन सुरळीत करण्याचं काम सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून या क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या आहेत. कुस्तीचा सराव करणारे मल्ल आणि स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्या मल्लांच्या मानधनात वाढ करण्यात येणार आहे. तसंच मल्लांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ ही देण्यात येणार आहे, असंही पाटील यांनी  सांगितलं.