‘पहिली गरवारे क्लब हाऊस शरद पवार अखिल भारतीय फिडे रॅपिड रेटिंग खुल्या बुद्धिबळ स्पर्धे’चं मुंबईत आयोजन

 


मुंबई (वृत्तसंस्था) :  गरवारे क्लब हाऊसच्या वतीनं आज दिनांक ७ जानेवारी २०२३ ला ‘पहिली गरवारे क्लब हाऊस शरद पवार अखिल भारतीय फिडे रॅपिड रेटिंग खुल्या बुद्धिबळ स्पर्धे’चं आयोजन मुंबईच्या वानखेडे स्टेडियम इथं करण्यात आलं आहे. या बुद्धिबळ स्पर्धेचं उद्घघाटन गरवारे क्लब हाऊसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते झाले. शरद पवार अखिल भारतीय फिडे रॅपिड रेटिंग खुल्या बुद्धिबळ स्पर्धेसाठी देशभरातून महाराष्ट्रासह दिल्ली, उत्तर प्रदेश, गुजरात, तामिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश आदी राज्यांतून ४०० हून अधिक प्रवेशिका दाखल झाल्या आहेत. मुंबईच्या बुद्धिबळ इतिहासात सर्वाधिक बुद्धिबळपटूंचा सहभाग असलेली ही महाबुद्धिबळ स्पर्धा असणार आहे. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेतील विजेत्यांना शरद पवार चषक आणि दोन लाख रुपयांचं पारितोषिक देऊन गौरवण्यात येईल. तसंच अन्य ४५ विजेत्यांनाही सन्मानित करण्यात येणार आहे, अशी माहिती गरवारे क्लब हाऊसचे संचालक आणि बुद्धिबळ समितीचे अध्यक्ष मोहित चतुर्वेदी यांनी दिली.