२०२१ ऑक्टोबर आणि सप्टेंबर या कालावधीत भारत हा जगातला सर्वात मोठा साखर उत्पादक आणि ग्राहक देश

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) ऑक्टोबर आणि सप्टेंबर २०२१ – २२ या कालावधीत भारत हा जगातला सर्वात मोठा साखर उत्पादक आणि ग्राहक देश ठरला आहे. देशात वर्ष २०२१ – २२ च्या ऊस गाळप हंगामात, पाच हजार लाख मेट्रिक टन साखरेचं विक्रमी उत्पादन झालं. यात सुमारे ३ हजार लाख मेट्रिक टन ऊसाचं गाळप होऊन, सुमारे ३९४ लाख मेट्रिक टन साखर उत्पादित झाली. यातील ३६ लाख मेट्रिक टन साखर इथेनॉल उत्पादनासाठी वापरण्यात आली. २०२१ – २२ या कालावधीत इथेनॉल च्या विक्रीतून साखर कारखान्यांना २० हजार कोटी रुपयांहून जास्त महसूल मिळाला. या कालावधीत, साखर निर्यातीत, ब्राझील नंतर देशाने दुसरं स्थान पटकावलं आहे.