अमेरिकेनं भारतातल्या व्हिसा कार्यालयातल्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्याची केली घोषणा

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) अमेरिकेनं प्रथमच भारतीय व्हिसा अर्जदारांच्या सोयीसाठी भारतातल्या त्यांच्या व्हिसा कार्यालयातल्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्याची घोषणा केली आहे. व्हिसा मिळवण्यासाठी वैयक्तिक मुलाखतीला हजर राहाव्या लागणाऱ्या अर्जदारांसाठी अमेरिकेनं ही सुविधा त्यांच्या दूतावासात उपलब्ध करून दिली आहे.

कोविड च्या काळात,अमेरिकी दूतावास आणि वाणिज्य दूतावासातील व्हिसा जारी करणाऱ्या  कर्मचारी  संख्येत कपात करण्यात  आली होती आणि केवळ आपत्कालीन सेवांसाठी व्हिसा जारी करण्याला प्राधान्य देण्यात आले होते.