अफगाणिस्तानच्या माजी संसद सदस्य मुर्सूल नाबिजादा यांची हत्या

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) अफगाणिस्तानच्या माजी संसद सदस्य मुर्सूल नाबिजादा यांची काल हत्या करण्यात आली. काबूलमधल्या त्यांच्या निवासस्थानी त्यांच्या शरीररक्षकासह त्यांची अज्ञात हल्लेखोरांनी हत्या केली.

नाबिजादा यांनी पूर्वी लाघमन प्रांताचं प्रतिनिधीत्व केलं होतं. तालिबाननं सत्ता ताब्यात घेतल्यानंतरही काबूलमध्ये राहत असलेल्या काही महिला माजी संसदसदस्यांमध्ये नाबिजादा यांचा समावेश होता.