भारतीय संस्कृती प्रश्न विचारणारी नसून समस्यांवर उत्तरं शोधणारी आहे - सुधीर मुनगंटीवार

 

मुंबई (वृत्तसंस्था) : भारतीय संस्कृती प्रश्न विचारणारी नसून समस्यांवर उत्तरं शोधणारी आहे, संस्कृतीवरची आक्रमणं देशाला घातक असून आपल्या संस्कृतीचा प्रचार प्रसार करण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतील असं सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.

पुण्याच्या एका प्रकाशनसंस्थेच्या हीरकमहोत्सवी कार्यक्रमात काल ते बोलत होते. सरसंघचालक मोहन भागवत देखील कार्यक्रमाला उपस्थित होते. जागतिक मूल्यांच्या परिप्रेक्ष्यात भारतीय संस्कृतीची वैशिष्ट्यं त्यांनी आपल्या भाषणात विशद केली. मान्यवरांच्या हस्ते १० पुस्तकांचं प्रकाशन यावेळी करण्यात आलं.