कलवरी वर्गाची पाचवी पाणबुडी “वागीर” ही आज भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) वागीर, ही कलवरी वर्गाची पाचवी पाणबुडी आज भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल झाली. नौदल प्रमुख  ॲडमिरल आर हरी कुमार यांच्या उपस्थितीत  मुंबईत झालेल्या समारंभात वागीर पाणबुडीचं जलावतरण झालं.  मेसर्स नेव्हल ग्रुप, फ्रान्सच्या सहयोगानं,  मुंबईतल्या माझगाव डॉक गोदीमध्ये या बोटीची बांधणी झाली आहे.

कलवरी वर्गाच्या चार पाणबुड्या यापूर्वीच भारतीय नौदलात दाखल झाल्या आहेत. भारताच्या सागरी हितसंबंधांना पुढे नेण्यामध्ये  भारतीय नौदलाच्या क्षमता वाढवण्यामध्ये वागीर महत्वाची भूमिका बजावणार आहे.  ही पाणबुडी ते पृष्ठभागा वरचं युद्ध, पाणबुडीविरोधी युद्धासह विविध मोहिमा हाती घेण्यासाठी सक्षम आहे.