कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या निधी आपके निकट या कार्यक्रमास सुरूवात

 


मुंबई (वृत्तसंस्था) : ईपीएफओ अर्थात कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेनं देशभरात जागरुकता वाढवण्यासाठी 'निधी आपके निकट' हा विशेष कार्यक्रम राबवण्यास सुरूवात केली आहे. यामध्ये प्रत्येक महिन्याच्या २७ तारखेला सर्व जिल्ह्यांमध्ये पोहोचणं तसंच संस्था आणि भागधारक यांच्यातील संबंध दृढ करणं हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. यानुसार, काल ईपीएफओच्या वतीनं ६८५ जिल्ह्यांमध्ये शिबिरांचं आयोजन करण्यात आलं होतं. ईपीएफओ मुख्यालयात काल कामगार आणि रोजगार सचिव आरती आहुजा यांच्या हस्ते हा उपक्रम सुरू करण्यात आला. यावेळी केंद्रीय भविष्य निर्वाह निधी आयुक्त आणि इतर अधिकारी उपस्थित होते. दूरस्थ पद्धतीनं झालेल्या या कार्यक्रमात खासदार, आमदार प्रादेशिक समिती सदस्य, जिल्हाधिकारी, प्रशासनकीय अधिकारी, औद्योगिक संस्थांचे प्रतिनिधी आणि क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी यांच्यासह ८५० हून अधिक लोकांनी भाग घेतला.

Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गांकरिता आरक्षण विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमताने मंजूर
Image
कुपवाडा येथील भारत-पाक नियंत्रण रेषेजवळ शिवजयंतीचा सोहळा
Image
मेगापॉलिस मेटाव्हर्सच्या मदतीने मुंबईच्या विकासाला अधिक गती – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Image