राजकीय विरोधकांना त्रास देऊन संपवण्याचा प्रयत्न सत्ताधारी पक्ष करत असेल तर हे महाराष्ट्र आणि राष्ट्रवादी काँग्रेसही खपवून घेणार नाही - अजित पवार

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राजकीय विरोधकांना त्रास देऊन संपवण्याचा प्रयत्न सत्ताधारी पक्ष करत असेल तर हे महाराष्ट्र आणि राष्ट्रवादी काँग्रेसही खपवून घेणार नाही, असा इशारा विधानसभेतले विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिला आहे. चुका कुणाच्याही असोत त्याच्यावर कारवाई करावी, परंतु मुद्दाम कुभांड रचून अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जातोय. इतक्या खालच्या पातळीवर राज्यातलं राजकारण जाणार असेल आणि सरकारी यंत्रणांचा वापर होणार असेल तर महाराष्ट्र शांत बसणार नाही, असं अजित पवार म्हणाले. गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या घटना घडत असताना सत्ताधारी पक्ष वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न करत आहे, महागाई, बेरोजगारी या महत्त्वाच्या प्रश्नावरुन लक्ष दुसरीकडे वळवण्याचा हा प्रयत्न आहे, या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या सगळ्या मुद्द्यांवर बैठकीत चर्चा करुन रणनीती ठरवण्यात आली, अशी माहिती पवार यांनी बातमीदारांशी बोलताना दिली.

Popular posts
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे कार्यक्षेत्रात स्वच्छ महाराष्ट्र अभियान - निबंध, चित्रकला, घोषवाक्य स्पर्धा
Image
जागतिक वारसा दिनाचे औचित्य साधून मुंबई आणि महाराष्ट्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन
Image
स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कृतज्ञतापूर्वक वंदन
Image
राज्यातील कामगारांच्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी संपर्क अधिकाऱ्यांची नियुक्ती - कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांची माहिती
Image
भारतानं सादर केलेल्या अजेंड्याला सदस्य देशांची प्राथमिक पातळीवर सहमती
Image