राज्यातल्या ३१ पोलीस अधिकाऱ्यांना शौर्य पुरस्कार, तर चार अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदकाचा सन्मान

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कायदा आणि सुव्यवस्था राखताना उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या ९०१ पोलीस अधिकाऱ्यांना यंदाच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त पदकं मिळाली आहेत. १४० अधिकाऱ्यांना शौर्य पदकं मिळाली असून त्यात महाराष्ट्रातल्या ३१ पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. ९३ अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक मिळणार असून त्यात  महाराष्ट्रातले चार अधिकारी आहेत. उल्लेखनीय सेवेबद्दल दिल्या जाणाऱ्या पदकांचे ६६८ मानकरी असून त्यात महाराष्ट्रातल्या ३९ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. शौर्य पुरस्कारात केंद्रीय राखीव पोलीस दलाचा क्रमांक सर्वात वरचा असून त्यांच्या ४८ अधिकाऱ्यांना हा सन्मान मिळाला आहे.नक्षल्यांविरोधात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गडचिरोली पोलीस दलातले २९ पोलीस अधिकारी आणि जवानांचा या यादीत समावेश आहे. नक्षलग्रस्त समजल्या जाणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यात गेल्या दशकभरात पोलिसांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे नक्षल चळवळीला मोठा हादरा बसला आहे. यादरम्यान नक्षल्यांचे अनेक मोठे नेते चकमकीत ठार झाले तर अनेकांनी आत्मसमर्पण केले. 

Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image