नवी दिल्ली(वृत्तसंस्था): देशाच्या उत्तर भागात थंडीची लाट आली असून राजधानी दिल्लीसह उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशातही थंडीची लाट आहे. राज्यातही तापमानात मोठी घट झाली असून नाशिक जिल्ह्यात ७ पूर्णांक ६ दशांश अशा किमान तापमानाची नोंद झाली आहे. निफाड मध्ये ५ अंश सेल्सिअस तर ओझर मध्ये ४ पूर्णांक ९ दशांश अंश सेल्सिअस इतकं किमान तापमान नोंदलं गेलं. अहमदनगरमध्ये गेल्या दोन दिवसांपासून कडाक्याची थंडी पडली आहे. धुक्यासह आलेल्या या थंडीमुळे पिकांवर मावा ,बुरशी या सारखे रोग पडलेले आढळून येत आहेत. धुळ्यात ५ पूर्णांक ५ दशांश, बारामती ८ पूर्णांक ३ दशांश तर जालना आणि परभणी मध्ये १० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. उद्गीर मध्येही दहा अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून जळगाव मध्ये ५ पूर्णांक ३ दशांश अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. पुण्यात ७ पूर्णांक ४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली तर नांदेड मध्ये १० पूर्णांक ६ दशांश अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे.
मुंबईत २३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. गोंदिया जिल्ह्याच्या तापमानातही सातत्यानं घट होत असून . गोंदिया जिल्ह्यात ७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. येत्या काही दिवसांत हिमालय क्षेत्रातल्या तापमानात वाढ होणार असून त्यामुळे उत्तर आणि मध्य भारतातली थंडीची लाट कमी होण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागानं व्यक्त केला आहे.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.