रस्ते अपघातांची संख्या वर्ष २०२५ पर्यंत ५० टक्क्यांनी कमी करण्यासाठी आपल मंत्रालय कटीबद्ध नितिन गडकरी यांची ग्वाही

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) रस्ते अपघातांची संख्या २०२५ या वर्षाच्या अखेरीस ५० टक्क्यांनी कमी करण्यासाठी आवश्यक ती सर्व पावलं उचलली जात असल्याची ग्वाही केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांनी काल दिली.

अशा अपघातांमुळे होणारे मृत्यू किंवा नागरिक जखमी होण्याच्या घटना कमी करण्यासाठी आपलं मंत्रालय कटिबद्ध आहे आणि यासाठी अभियांत्रिकी, अंमलबजावणी, शिक्षण आणि आपातकालीन सेवा या चतुःसूत्रीवर आधारित अनेक कामं मंत्रालयानं हाती घेतली आहेत, असंही ते म्हणाले.

रस्ते सुरक्षा सप्ताहांतर्गत रस्ते सुरक्षा अभियान या कार्यक्रमात बोलताना ट्रक चालकांच्या कामाच्या वेळा निश्चित करण्यासाठी लवकरच देशात कायदा आणणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.