मुंबईत होणाऱ्या जागतिक पर्यटन शिखर परिषदेबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने रोड शो चं आयोजन

 

मुंबई (वृत्तसंस्था) : येत्या १० ते १२ एप्रिल दरम्यान मुंबईत होणाऱ्या जागतिक पर्यटन शिखर परिषदेबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने मुंबईत काल एका रोड शो चं आयोजन करण्यात आलं होतं. देशाला मिळालेल्या जी-२० परिषदेच्या अध्यक्षपदाच्या पार्श्वभूमीवर, केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने या शिखर परीषदेचं आयोजन केलं आहे.या परिषदेच्या माध्यमातून,देशाला एक प्रमुख पर्यटन स्थळ म्हणून ओळख मिळवून देण्याचं उद्दिष्ट आहे.

पर्यटन क्षेत्रात,२०२३ पर्यंत १४० दशलक्ष रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचं सरकारचं उद्दिष्ट असल्याचं, केंद्रीय पर्यटन मंत्रालयाचे संचालक प्रशांत रंजन यांनी सांगितलं. तसंच,या क्षेत्रात गुंतवणुकीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी ऑनलाईन पोर्टल विकसित करण्यात येत असल्याची माहिती राज्याच्या पर्यटन आणि सांस्कृतिक व्यवहार विभागाचे प्रमुख सचिव सौरभ विजय यांनी दिली.