मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नाडेला यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची घेतली भेट

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नाडेला यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीत  महत्त्वाच्या मुद्द्यांवर अर्थपूर्ण चर्चा झाल्याचं नाडेला यांनी ट्विटरवर म्हटलं आहे.

तंत्रज्ञानाच्या वापरातून सर्वसमावेशक आर्थिक विकासाचा सरकारचा दृष्टीकोन प्रेरणादायी असून भारताची डिजिटल प्रगती साऱ्या जगाला मार्गदर्शक ठरेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे.