ऑलिंपिकसाठी गुजरातच्या मागणीबाबतच्या तयारीचा अमित शहा यांनी घेतला आढावा

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी 2036 च्या ऑलिंपिकसाठी गुजरातच्या मागणीबाबतच्या तयारीचा काल प्राथमिक आढावा घेतला. अहमदाबादमध्ये झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत शहा यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या पायाभूत सुविधा कालबद्ध पद्धतीनं तयार करण्याच्या सूचना दिल्या.

या बैठकीला गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि क्रीडामंत्री हर्ष संघवी बैठकीला उपस्थित होते. नरेंद्र मोदी स्टेडियमच्या जवळ उभारल्या जात असलेल्या सरदार वल्लभभाई पटेल क्रीडा संकुलामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्य पायाभूत सुविधा विकसित करण्याच्याही शहा यांनी सूचना दिल्या.