महाराष्ट्र राज्य हे देशाच्या स्टार्टअपची राजधानी ठरत आहे- मंगलप्रभात लोढा

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय स्टार्टअप दिन आज साजरा होत आहे. स्टार्टअप आणि युनिकॉर्न्सना चालना देण्यासाठी राज्यात विविध सवलती, आणि योजना यांची अंमलबजावणी करण्यात येत असून, राज्यात स्टार्टअपच्या विकासासाठी अनुकूल वातावरण तयार करण्यात येत आहे. तसंच महाराष्ट्र राज्य हे देशाच्या स्टार्टअपची राजधानी ठरत आहे, असं मत राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी व्यक्त केलं.

राष्ट्रीय स्टार्टअप दिनाच्या पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया देताना ते बोलत होते. राज्यातल्या अगदी दुर्गम भागातल्या युवक - युवतींकडूनही स्टार्टअप विकसित केले जात असून, नुकत्याच राबवण्यात आलेल्या स्टार्टअप यात्रेला सर्वच भागातून चांगला प्रतिसाद मिळाला असं लोढा यांनी सांगितलं.